"स्वदेशी"म्हणजे काय?
स्वदेशी म्हणजे देशाला जगापासून बंद करून घेणे नाही.
आ नो भद्रा: क्रतवो यंतु विश्वत:।
जे माझ्या घरात बनू शकते ते मी बाजारातून आणणार नाही.
माझ्या गावाच्या बाजारात जे मिळते ते मी बाहेरच्या गावातून घेणार नाही.
या क्रमाने पुढे जात राहिले तर जे आपल्या देशात बनते ते बाहेरच्या देशातून आणायचे नाही.परंतु जे आपल्या देशात तयार होत नाही आणि जीवनावश्यक आहे ते मात्र परदेशातुन सुद्धा आणेन परंतू ते मिळाल्यावर आपल्या देशाची प्रकृती आणि आपल्या देशाच्या आकांक्षेला अनुरूप असा बदल करून घेऊ आणि प्रयत्न करू की सर्व काही आपल्या देशात निर्माण होईल."
ConversionConversion EmoticonEmoticon