1) नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातील आत्मा साक्षीरूपाने प्रकटतो. हीच दिवाळी होय.
२) नामस्मरण करण्याची वेळ झाली की अध्यात्मिक भूक जागी होते. ती वेळ सहसा टाळू नये. म्हणजे हळू हळू ती भूक जीवनाला व्यापून राहते. अखंड नामस्मरणाचे मर्म यात साठवले आहे.
३) नामस्मरण चालू झाले की भगवंताचे (किंवा सद्गुरूचे) सान्निध्य भासले पाहिजे. ते लाभले नाही तर त्याची तीव्र खंत वाटली पाहिजे.
४) नामस्मरण करता करता इंद्रियांची धडपड व धाव नकळत क्षीण होते; पण नामाची धारा चालते. हीच गुरुकृपेची प्रचीती होय.
५) नामस्मरणाने भगवंत (अथवा सद्गुरू) जवळ आहे हा भरवसा नकळत निर्माण होतो. त्यामुळे डोळ्यांना जग तर दिसतेच पण त्याच्या पलीकडे देखील दिसते.
६) नामस्मरण मनात स्थिर झाले की देहाचा मधून मधून विसर पडतो. त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये स्थलकालाचे भान उरत नाही.
७) सद्गुरूकडून आलेले नाम भगवंताकडून आलेले असते. त्या नामानेच भगवंताचे दर्शन घडते. देहस्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो.
८) नामस्मरणाने नकळत भगवंताचे (अथवा सद्गुरूचे) एक रूप मनात तयार होते. पुढे ते रूपच मनाला व्यापून राहते. नाम घेणारा मधून मधून त्या रूपाशी समरस होतो.
९) नामस्मरणाचा अनुभव लवकर पाहिजे का? मग रोज रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करावे. देवाच्या दर्शनाशिवाय मला काही नको हा विचार घट्ट धरून ठेवावा. तेथे तल्लीनता आली की भगवंताचा प्रकाश झळकतो.
१०) नामस्मरण करणा-याने एक नियम पाळावा. तो हा की, नाम घेण्याची उर्मी आली म्हणजे सारी कामे बाजूला सारावी आणि आसनस्थ होऊन नामस्मरण करावे. अशा उर्मीच्या पालनातूनच नामाची उर्मी हा स्वभाव बनतो.
: ११) नामाच्या उर्मीला बाधक किंवा मारक तर्क, वातावरण किंवा व्यक्ती कुशलपणे बाजूला कराव्या, त्याने फारसे नुकसान होणार नाही; झाले तरी सद्गुरू भरून काढतील.
१२) नामाला नित्याचे मोजमाप असावे. पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात, पूजनात, संभाषणात व प्रार्थनेत गुंतून ठेवावे. अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते. अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो.
v
१३) एक वर्ष मौन पाळून नामस्मरण केले, तर वाणी पवित्र होऊन वाचासिद्धी प्राप्त होते.
१४) या जगात नामाशिवाय दुसरे काही सत्य नाही या भावनेने कbायम मौन पाळून नामात राहणारा माणूस महापुरुष समजावा. त्याला हृदयातील अंगुष्टमात्र ज्योतीचे अखंड दर्शन घडते.
१५) नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा. म्हणजे वायफळ व बाधक बोलण्याला अपोआप खंड पडतो. इंद्रियांची बाहेर धावण्याची धडपड नकळत क्षीण होते. म्हणजे मग आत नामाची धारा अनुभवास येते.
१६) नामाचे अनुभव ज्याचे त्याला. ते सांगू नये हे खरे. पण नामस्मरण करणा-या माणसाची नामावरील श्रद्धा घट्ट व्हावी या शुद्ध हेतूने नामाचे अनुभव सांगायला सद्गुरू परवानगी देतात. म्हणून प्रचीती सांगण्याला दोष नाही.
१७) थोड्या अभ्यासाने नामस्मरण पचनी पडते. नाम पचनी पडल्यावर मग नामस्मरण ही एक अध्यात्मिक प्रक्रिया माणसाच्या अंतर्यामी आरंभ पावते.
१८) या प्रक्रियेच्या दोन खुणा आहेत. खूण पहिली- आतमध्ये चालणारे नाम मी घेत नसून ते एका निराळ्या शक्तीने चालते हे स्वच्छपणे कळते. दुसरी खूण- हृदयातील “मी” च्या असण्याची भावना (म्हणजेच अहंकार) क्षीण होत जाऊन त्याची जागा भगवंत (अथवा सद्गुरू) घेतात. अशा रीतीने भगवंत हृदयात अवतरतो.
१९) ज्याच्या हृदयात सतत नाम घेणारा मी आहे आणि त्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे, तो पुरुष खरोखर धन्य होय.
२०) नामस्मरण करता करता त्याचा नाद आत निनादू लागतो. तो अधिकाधिक सूक्ष्म होऊन स्थिरावतो. अखेर त्याचे पर्यवसान अनाहत नादामध्ये घडून येते.
२१) नाम पचनी पडणे ही नामस्मरणाची पहिली पायरी आहे. या पायरीची खूण अशी- दिवसाच्या चोवीस तासात आपण देहाच्या आत बाहेर कितीतरी वेळा जातो येतो. ती आतबाहेर जाण्याची क्रिया नामाच्या संगतीत होऊ लागते.
२२) नाम घेता घेता आजूबाजूच्या जगाची संवेदना लटकी पडू लागते. मग आत भरलेल्या जगाची कल्पना येते.
२३) नामस्मरणाने आतील जगाचा लोप झाला की देह स्वभाव पालटतो. जीवनात एक ईश्वरकेंद्रित नवीन लय निर्माण होते. त्यामुळे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते.
२४) नाम घेणारा एकदा का ईश्वरकेंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रश्न उरतच नाही. त्याच्याकडे लक्ष असो वा नसो, तो सतत दिसतच राहतो.
२५) सामान्य माणूस नाम घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणा-या व नामाला बाधणा-या गोष्टी करतो, त्यांचा परिणाम धुवून काढण्यास अखेर नामच उपयोगी पडते.
२६) मौज अशी आहे की श्रीसद्गुरूंचे अंतर्याम नामाने काठोकाठ भरलेले असते. शिष्य नामस्मरण करता करता नामाने भरत जातो. तो जसजसा नामाने भरत जाईल, तसतसा तो गुरूच्या अंतर्य.
!! जय हरी!!
ConversionConversion EmoticonEmoticon