🌺जनन शांती – माहिती ,कधी जनन शांती करावी* 🌺
*जनन शांती म्हणजे जन्माच्या वेळेचा अशुभ असा काळ विविध वाईट योगावर जन्म झाल्यानंतर त्या बाळावर येणारी संकटे, पीडा व त्याच्याजवळच्या* *नातेवाईकास होणारा मानसिक त्रास याचे वर्णन आपल्या ग्रंथात आढळते. आणि या कुयोगामुळे त्या बाळाला सुद्धा मानसिक त्रास, आरोग्य विषयकसमस्या, शैक्षणिक उत्कर्षास बाधा होणे असा* *प्रकारचात्रास होऊ* *शकतो. त्यामुळे आपल्या ऋषी मुनींनी यावर सविस्तर उपाय* *करून ठेवले आहेत**आपल्या हातुन त्या देवतेचे विधिवत पूजन झाल्यास तो दोष निघून जातो व प्रसन्नता लाभते.
शक्यतो बालकाच्या जन्मापासून बाराव्या दिवशी जनन शांती करावी त्यावेळी मुहूर्त वगैरे पाहण्याची आवश्यकता नाही त्यावेळी नाही जमल्यास योग्य दिवशी मुहूर्त पाहून अग्नी पृथ्वी वर असताना योग्य गुरुजींकडून करून घ्यावी .
सर्व साधारण पुढील कुयोगावर जन्म झाल्यास शांती करतात. – तिथी , कृष्ण चतुर्दशी , अमावस्या , क्षयतिथी – रुद्र अभिषेक + शांती
पंचमी + षष्ठी, दशमी – एकादशी, पौर्णिमा – प्रतिपदा – अमावस्या प्रतिपदा – ह्यांच्या संधीकालच्या दोन घटी यांना तिथी गंडात म्हणतात. लग्न मुंड
(शांती) कर्क – सिंह, वृश्चिक – धनु – मीन – मेष, ह्यांच्या लग्न संधीच्या घटिकेला लग्न गंडांत म्हणतात.
*अन्य कारणे *: यमल (जुळी संतती), एकनक्षत्र (भावंडांचे एकच नक्षत्र किंवा आई/वडील व मूल यांचे एकच नक्षत्र असल्यास), त्रिकप्रसव (तीन पुत्रांनंतर कन्याजन्म किंवा तीन कन्यांनंतर पुत्रजन्म), सदंत (दात असलेल्या बालकाचा जन्म), अधोमुखजन्म (पायाळू), षड्ग्रहादि (पत्रिकेतील एकाच स्थानात ६ ग्रहांची युती असेल तर), (पौष महिन्यात स्त्रीची पहिली प्रसूती झाली तर), विपरीतजनन (चमत्कारिक अवयव, अवयवन्यूनता व अवयवाधिक्य), इ. या अशा वेगवेगळ्या शांती मध्ये देवता त्यांच हवन वेगवेगळं असतं तसेच जनन शांती सोबत गोप्रसव शांत केली जाते त्यामधे गाईची पूजा, गाईला तीन प्रदक्षिणा गाईने बालकाला हुंगणे अवघ्राण म्हणजे मातापित्यांनी बालकाची टाळू हुंगणे इत्यादी अंतर्भूत असते . शिवाय जातकाचा जन्म झाल्यावर योग्य ज्योतिषांकडून त्याची पत्रिका बनवून घ्यावी योग्य वेळी ह्या सगळ्या शांती केल्या म्हणजे बालकाचे भविष्य उज्वल होते
*धर्मसिंधुप्रमाणे जननशांती शास्त्रार्थ*
*१) मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर पुत्राचा जन्म झाल्यास पित्याला त्रास* *संभवतो. तिसर्या चरणी धननाश व चतुर्थ चरणी कुलनाश होतो. तसेच मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर* *पुत्रीचा जन्म हा सासऱ्यासाठी व द्वितीय चरण सासू*
*साठी त्रासदायक ठरते. पुढील*चरणांचे फल तसेच*जाणावे.* म्हणून मूळ नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्म झाला असल्यास शांती करावी*. *🌺ज्येष्ठा नक्षत्राच्या शेवटच्या दोन घटिका म्हणजे ९६ मिनिटे व मूळ नक्षत्राच्या सुरवातीच्या दोन घटिका म्हणजे ९६ मिनिटे या १९२ मिनिटांच्या कालावधीस अभुक्त मूळ असे म्हणतात.*🌺अभुक्त मूळ असता जन्म झाल्यास आठ वर्षे बालकास अन्यत्र ठेवावे (म्हणजेच त्याचा त्याग करावा.) व त्यानंतर त्याची शांती करावी. मूळ नक्षत्राचा दोष आठ वर्षे पर्यंत असतो. म्हणून इतका काल पर्यंत मुलाचे दर्शन वर्ज्य करावे.
२) आश्लेषा नक्षत्राच्या द्वितीय चरणी धननाश, तिसर्या चरणी मातेला व चतुर्थ चरणी पित्याला तसेच सासू–सासरे यांना त्रासदायक असते . या करिता आश्लेषा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्म झाला असल्यास शांती करावी.
३) ज्येष्ठा नक्षत्रावर कन्या जन्मल्यास ज्येष्ठ दिरास त्रास. ज्येष्ठा नक्षत्राचे समान दहा भाग केल्यास पहिल्या भागात बालकाचा जन्म झाल्यास – मातेची आई, दुसरा भाग – आईचे वडिल, तिसरा भाग – मामा , चौथा भाग – माता, पाचवा भाग – स्वतः , सहावा भाग – गोत्रज, सातवा भाग – पिता व माता अशा दोन्ही कुलांसाठी त्रासदायक , आठवा भाग – ज्येष्ठ बंधु, नववा भाग – सासरा व दहावा भाग – सर्वांना त्रासदायक ठरू शकतो. याकरिता ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या बालकांची शांती करावी.
टीप – म्हणून मूळ, आश्लेषा, ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची शांती करून घ्यावी.
४) चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध – पुष्य नक्षत्राचे मधले दोन चरण, पूर्वाषाढा – तिसरा चरण, उत्तरा फाल्गुनी – प्रथम चरण या नक्षत्रांवर बालकाचा जन्म झाल्यास पिता, पुत्र, भ्राता व स्वतः यांचा नाश होतो. याकरिता – अ) चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध – गोप्रसवशांति करून नक्षत्र देवतेची पूजा व अजा दान करावे.
ब) पुष्य नक्षत्राचे मधले दोन चरण – गोप्रसव शांति करून नक्षत्र देवतेची पूजा व गाईचे दान करावे.
क) पूर्वाषाढा – तिसरा चरण – नक्षत्र देवतेची पूजा व सुवर्ण दान करावे.
ड) उत्तरा फाल्गुनी प्रथम चरण – नक्षत्र देवतेची पूजा व तिलपात्र दान करावे.
५) मघा नक्षत्राच्या पहिल्या चरणात जन्म झाल्यास मूळ नक्षत्राप्रमाणे फळ जाणावे त्या ठिकाणी गोप्रसवशांती, नक्षत्र देवतेचे पूजन व ग्रहमख ही करावी. मघा नक्षत्राच्या पहिल्या १९२ मिनिटात जन्म झाला असल्यास नक्षत्र गंडातशांती करावी.
६) रेवती नक्षत्राच्या शेवटच्या १९२ मिनिटात व अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या १९२ मिनिटात जन्म झाला असल्यास नक्षत्र गंडांत शांति करावी. अन्य वेळा जन्म असेल तर शांती नाही.
७) विशाखा नक्षत्राच्या चतुर्थ चरणी जन्म झाला असल्यास फक्त ग्रहमुख करावा. नक्षत्रशांती नाही.
८) इतर सर्व नक्षत्रांच्या शांती नाहीत.
९) शांतीचा मुख्य काल – जन्म झाल्यावर बाराव्या दिवशी अथवा जन्मनक्षत्री अथवा शुभ दिवशी शांति करावी. जन्म झाल्यावर बाराव्या दिवशी शांति करावयाची असेल तर सांगितलेली नक्षत्रे, आहुति, अग्निचक्रे इत्यादी पहाण्याची जरूरी नाही. इतर काली शांती करावयाची असेल तर अवश्य पहावे. अग्निचक्र पंचांगात दिलेले असते. ते पहावे किंवा शु. १ पासून चालू तिथिपर्यंत तिथि मोजून येणार्या संख्येत १ मिळवावा. रविवार पासून चालू दिवसांपर्यंत दिवस मोजावेत. तो अंक मागील अंकात मिळवावा. या बेरजेस ४ ने भागून बाकी ० किंवा ३ उरल्यास अग्नि भूमीवर, २ उरल्यास पाताळी, १ उरल्यास स्वर्गलोकी अग्नि जाणावा. शांतीचे दिवशी अग्नि भुमीवर असावा. आहुति पाहण्याचा प्रकार असा – सूर्यनक्षत्रापासून आरंभ करून चंद नक्षत्रापर्यंत नक्षत्रे मोजावीत. ३ ३ नक्षत्रे मिळून एक ग्रहाचे मुखी आहुति पडते. पहिल्या ३ नक्षत्री सूर्याचे मुखी, दुसर्या ३ नक्षत्री बुधाचे मुखी, तिसर्या ३ नक्षत्री शुक्राचे मुखी, चौथ्या ३ नक्षत्री शनीचे मुखी, पाचव्या ३ नक्षत्री चंद्राचे मुखी, सहाव्या ३ नक्षत्री मंगळाचे मुखी, सातव्या ३ नक्षत्री गुरूचे मुखी, आठव्या ३ नक्षत्री राहूचे मुखी, नवव्या ३ नक्षत्री केतूचे मुखी आहुति जाणावी. ज्या दिवशी शुभ ग्रहाचे मुखी आहुति पडते तो दिवस शुभ व पापग्रहाचे मुखी आहुति असेल तर तो अशुभ दिवस मानावा.
शांतीकर्मामध्ये अग्निचक्र अवश्य पहावे.
तीन उत्तरा, रोहिणी, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पुनर्वसु, स्वाती, मघा, अश्विनी, हस्त, पुष्य, अनुराधा व रेवती ही नक्षत्रे असताना, आणि गुरुशुक्राचा अस्त नसताना व मलमास नसेल तर तो दिवस शुभ मानावा.
🙏🌸🙏🌺🙏🌸🙏🌺🙏
ConversionConversion EmoticonEmoticon