तुळशीचे अध्यात्मिक व वैज्ञानीक महत्व

--------------------------------
तुळशीचे अध्यात्मिक व
वैज्ञानीक महत्व
-------------------------------------

खरे तर पंढरपूरची वारी ही वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. या वर्षी जरी कोरोना महामारीमुळे हा सोहळा अपवाद ठरला, तरी या सोहळ्याचे अनन्य साधारण आध्यात्मिक महत्व आहे.
या वारी सोहळ्यात महिला वारकरी गटांमध्ये अभंगांबरोबरच लोकगीतांचे अस्तित्व दिसून येते. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला झपझप चालताना मुखाने ;
*‘माउली माउली, तू संतांची* *सावली, दारी तुळस लावावी,’*
असं म्हणताना दिसतात. त्यांच्या या गीतांमधून दारांमध्ये तुळस लावण्याच्या संदेशाबरोबरच माउलींचे महत्त्वही ठसत राहते. आम्हाला शाळेतील शिक्षण फारसे झालेले नसले, तरी जगण्यातील शहाणपण या गीतांमधूनच मिळत असल्याचे या महिला वारकरी सांगतात.

आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगीतले आहे.
त्यापाठीमागेपुढील दोन महत्वाची कारणे आहेत.

*१) अध्यात्मिक महत्व-*

याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.
जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्यानेदेवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करूनसोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्नसर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सतीपतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात.
या दृष्ट कृत्याचा नाश करण्यासाठी भगवान विष्णु जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते.

नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही त्रेतायुगात मनुष्य जन्म घेऊन, तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते.

भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला.

देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘ *शालिग्राम* ’ म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने वपांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘ *शालिग्राम* ’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

*२) वैज्ञानीक महत्व-*

जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत.
तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते. या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे.
-----------------------------------------------

-----------------------------------------------
Previous
Next Post »

In construction

Add