यालाच म्हणतात का प्रेम ..?

यालाच म्हणतात का प्रेम ..?
उदास-उदास रहायचं, आठवणीत दडत जायचं,
तु सोबत नाही म्हणून, डोळ्यांत पाणी दाटायचं,
यालाच . . .
एकट-एकट रहायचं नुसत गुणगुणत चालायचं,
गालावर हसु नाही म्हणून ओठानेच गाणं गायचं,
यालाच . . .
उगाच हसु आणायचं ,
दुसऱ्‍याला हसताःना बघायचं,
मनात दुःख आहे म्हणुन
कोपऱ्‍यात जाउन रडायचं,
पक्षासारखं नुसत हिंडायच,
या झाडावरुन त्या झाडावर हिंडायचं,
घरटच नाही आतल्याला म्हणुन आभाळाकडे आतुरतेने बघत रहायचं . . .
मायेच्या सावलीत लपुन राहायचं,
झाडाशी गोड नात बांधून ठेवायचं
शेवटी ओलावाच राहीला नाही
म्हणून वाळलेल्या पानासारखं गळून पडायच,
यालाच . ...
हातात-हात टाकून चालायच
पावला सोबत पाऊल टाकत जायच मध्येच आपल्याया एकट सोडलं म्हणून एकटच सोडल म्हणून एकटच चालत राहायच,
यालाच. . ...
आभाळतून खाली पडायचं कधी शिंपल्यात जावून मोती व्हायच,
पण सगळ काही संपुन जात म्हणून डोळ्यातून अश्रु होवून वाहायच,
यालाच म्हतात का प्रेम....?



        
Previous
Next Post »

In construction

Add