प्रपोझल

प्रपोझल


बोल...आयुष्य भरासाठी तुझि साथ मला देशील ? 
माझ्या सारख्या वेडगळ , साधसचं जीवन जगणाऱ्या ...
अन साधसचं राहणीमान असलेल्या ..
मुलाशी लग्न करशील ? 
तयार आहेस ? 
तू चंद्र तारे म्हणशील तर , 
ते तुला मी कदापि आणून देणारं नाही  हा ...
अश्या वायफळ बाता मी करणार नाही. 
पण कले कलेतून वाढत जाणाऱ्या त्या चंद्राची शीतलता 
अन मिणमिणत्या ताऱ्यांची लखलख आणि 
ते अथांग विश्व तुला जवळून अनुभवायला नक्कीच मिळेल. 
ह्याची खात्री देतो .
कसं ते माझ्यावर सोपवं ...
त्यातला आनंद तुला नक्कीच मिळेल. 
आजवर तुझ्यावर ओघाने प्रेम करत आलोयं .. 
तो ओघ ह्या पुढे हि कायम राहील . 
पण मनातून उमटलेली प्रत्येक भावना तू त्या त्या वेळेस समजून घेशील हि आशा व्यक्त करतो. 
....


Previous
Next Post »

In construction

Add